Pune Bandh : वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंद, पवार, ठाकरे आणि उदयनराजेंचा हल्लाबोल
महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद पुकारण्यात आला होता. या बंदला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.. बंदमधे वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि इतरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदमधे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच दुणावल्याचं पाहायला मिळालं.. या बंदला पुण्यातील सर्व व्यापारी संघटना, वाहतुक संघटना, गणेशोत्सव मंडळांकडून पाठिंबा देण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या






















