Sushma Andhare on Ajay Tavare : पुरावे नष्ट करण्यासाठी तावरेला धोका निर्माण केला जाऊ शकतो
पुणे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेंचं नाव पुढे आलं.. डॉ. अजय तावरेंच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. तसंच अजय तावरे हा रक्ताचे नमुने बदलण्यापुरताच मर्यादित नाहीये. तर गेल्या दहा वर्षात तावरेनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं.असंही अंधारे म्हणाल्यात.
अहवाल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे
ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला. आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देखील प्राप्त झाला. अहवाल प्राप्त झाल्याने तातडीने क्लास वन अधिकारी डॉ.अजय तावरे यांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर डॉ. श्रीहरी हरनोळ हे क्लास टू चे रँकचे अधिकरी आहेत. हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांची तातडीने शासन स्तरावर आता कारवाई झाली असून डॉ. तावरेंकडीली पदभार काढून घेण्यात आला आहे.