Pooja Chavan Suicide Case : राठोडांच्या राजीनाम्यावरुन दोन गट, शिवसेनेच्या बैठकीला राठोड अनुपस्थित
मुंबई : संजय राठोड प्रकरणी शिवसेनेनं 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच संजय राठोडांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असल्याची देखील माहिती आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा सुरु आहे. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह आहे. राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं मत अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलंय. राजीनाम्याच्या प्रश्नावर अद्यापही कुणाकडेच ठोस माहिती नाही हे मात्र नक्की.
शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरुन दोन गट
शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरुन घेऊन दोन गट पडल्याचे दिसते आहे. मात्र आधीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटाचे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात सेनेच्या खासदार भावना गवळी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाजोरिया, देशमुख यांच्यासारखे नेते. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा का? संजय राठोड यांनी मीडियासमोर येऊ नये. संजय राठोड आणि परिवाराने नक्की कुठे राहावे? संजय राठोड यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली त्यातील महत्वाचा दुआ, असे बरेच 'निर्णय', 'आदेश' किंवा 'सल्ले' देण्यात आले आहेत. त्यात परवा शिवसेनेची बैठक झाली.
Pooja Chavan Suicide Case | विदर्भातील काही शिवसेना नेते राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही
पूजा चव्हाणच्या रिपोर्टचं काय झालं?
पूजा चव्हाण प्रकरणाचा रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरु आहे. पोलीस पूर्णपणे वेळ घेऊन रिपोर्ट तयार करत आहेत. रिपोर्टमध्ये कोणतीही कमी ठेवायची नाहीय, जेणेकरून पुणे पोलीसांवर संशय निर्माण होईल. या रिपोर्टमध्ये तिच्या कॉल्स रेकॉर्ड्स, फॉरेन्सिक रिपोर्ट, संबधित व्यक्तीचं कनेक्शन, बॅंक डिटेल्स आणि पासपोर्टची माहिती मिळणार आहे. रिपोर्ट पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर त्याचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती आहे.
Sanjay Raut | संजय राठोड यांच्याविषयी शिवसेनेत कुठलेही गट नाहीत : संजय राऊत
पूजा चव्हाण प्रकरण सरकार दडपण्याचा प्रकार करतंय- प्रवीण दरेकर
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना म्हटलं की, पूजा आत्महत्या प्रकरण सरकार दडपतंय की काय? पूजा ही चक्कर येऊन पडली, तिने आत्महत्या केली असे वेगवेगळे अंदाज बांधले जातायत. परंतु त्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप,लॅपटॉप यांची चौकशी होत नाहीये. एवढेच काय तर त्या ऑडिओ क्लिप मधील बोलत असणाऱ्या अरुण राठोड या तरुणाच्या घरी चोरी झाल्याचं कळतंय. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची भीती असताना सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रकार करतंय की काय असा आरोप विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.
Pooja Chavan Suicide Case|मुलीच्या मृत्यूमुळे उठलेल्या वादंगावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया EXCLUSIVE
दरम्यान पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया देताना माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचं म्हटलं होतं. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज होतं, असंही ते म्हणाले होते.