Uttamrao Jankar Meet Devendra Fadnvis : माढा मतदारसंघातील नेते पुन्हा फडणवीस यांच्या भेटीला
माढ्याची जागा वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोलापूर आणि माढा या पट्ट्यातील लोकप्रिय धनगर नेते उत्तमराव जानकर यांना देवेंद्र फडणवीसांनी नागपूरला बोलावलं आहे. विशेष म्हणजे जानकरांसाठी भाजपनं खास चार्टर्ड विमान पाठवलं. जानकर, जयकुमार गोरे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील या विशेष विमानात बसून सकाळी साडे सातच्या सुमाराला नागपूरकडे रवाना झाले. उत्तम जानकर हे धैर्यशिल मोहितेंना पाठींबा देण्याच्या तयारीत होते. मात्र तसं झालं तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फटका बसू शकतो असं भाजपला वाटलं, आणि म्हणून उत्तम जानकरांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केला. त्याचाच भाग म्हणून बारामतीला विशेष विमान पाठवण्यात आलं. एवढंच नाही तर जानकरांना दिल्लीत अमित शाहांची भेट घडवून देतो असं आश्वासन दिल्याचीही माहिती मिळतेय. जानकरांनी मात्र अजून ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. फडणवीसांशी चर्चा झाल्यावर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू असं जानकर म्हणालेत.
![Gyanesh Kumar New Election Commissioner Of India : ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1400f26fa325cac0ea814370e49a80761739816413410977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f34b844b629cb39f5e6dbf4308fa68fa1739780014786718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/91d421abdcf07cff67d7709161536a2c1739771537475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)