Udayan Raje Bhosale : अल्टीमेटम संपला, Bhagat Singh Koshyari यांच्याबद्दल उदयनराजे काय भूमिका घेणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय घमासान सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारनं कारवाई न केल्यास, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत शिवसेनेची दिशा आज ठरणार आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलेय तर, खासदार उदनयराजे भोसले यांनीही राज्यपाल कोश्यारींबाबत दिलेला अल्टिमेटम आज संपतोय. कारवाई न झाल्यास २८ नोव्हेंबरला पुढील भूमिका स्पष्ट करू असं उदयन राजेंनी सांगितलं होतं. आज दुारी १२ वाजता पुण्यातल्या रेसिडेन्सी क्लबमध्ये उदयनराजे आणि शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.






















