Supriya Sule Baramati Loksabha : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळABP Majha
शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आजपासून प्रचाराचा नारळ वाढवला. कन्हेरी येथील मारुती मंदिरासमोर शरद पवारांनी नारळ वाढवून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा आरंभ केला.. यावेळी शरद पवारांसह श्रीनिवास, सुनंदा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार या कुटुंबातील मंडळींसह पक्षातील नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.. सुप्रिया सुळे यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला..बारामती मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे. त्यांच्याविरुद्ध भावजय सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात आहेत. त्यांनीही कालच उमेदवारी दाखल केली..निवडणूक कोणतीही असो, १९६७ पासून पवार कुटुंबिय निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या गावच्या कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवूनच करत आले आहेत. दरम्यान आता बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कन्हेरीचा मारुती यंदा कोणाला पावणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.