Smruti Irani on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गाची माहिती कोणी लीक केली ?
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये निदर्शकांनी तब्बल 15 ते 20 मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे देशाचं राजकारण तापलं असून भाजपने पंजाबमध्ये सत्ता असलेल्या काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत संतप्त सवाल करत पंजाब काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. पंजाबच्या पवित्र भूमीत काँग्रेसचे खुनी इरादे नाकाम राहिले असा हल्लाबोल स्मृती इराणी यांनी केला आहे.
स्मती इराणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही संतप्त सवाल करत पंजाब कॉंग्रेसला धारेवर धरले. यावेळी सुरुवातीला त्यांनी अशाप्रकारचं कृत्य भारताच्या राजकारणात कधीच घडलं नव्हतं असं म्हणत घटनेचा निषेध केला. तसंच काँग्रेसचे खूणी इरादे नाकाम राहिल्याचं सांगत या सर्वासाठी पंजाब कॉंग्रेसला दोषी ठरवलं. दरम्यान पंतप्रधानांच्या ताफ्याला चुकीची माहिती का दिली? असा सवाल इराणी यांनी उपस्थित केला. तसंच अशाप्रकारे ताफा खोळंबल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेला फोनही उचलला नसल्याने इराणी यांनी संताप व्यक्त करत अशाप्रकारे फोन न उचलण्याचे कारण विचारले.