Sharad Pawar Mumbai Speech : शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना काय निवेदन दिलं? UNCUT भाषण
Sharad Pawar Mumbai Speech : शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना काय निवेदन दिलं? UNCUT भाषण
Ajit Pawar : सहकारात काही लोकं चुकीची कामं करतात, मग सत्तेत सहभागी होतात आणि चुकीच्या केलेल्या गोष्टीबाबत स्टे आणतात. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, अशा लोकांनी जरी प्रवेश केला तरी त्यांच्यावरची कारवाई सुरूच ठेवायची, म्हणजे हे लोक सुतासारखी सरळ होतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर केले आहे. दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ शतकोत्तर सुवर्णस्मृती दिन 150 व्या वर्षानिमित्त आयोजित "सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण" या विशेष परिसंवादात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. दख्खनची उठाव झालेली शौर्य भूमी माझ्या मतदार संघातील आहे. सूपा परगणा माझ्या बारामती मतदारसंघात हा विभाग येतो. विद्याधर अनस्कार यांच कौतुक करायला हवं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनासकर प्रशासक, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी देखील अनासकर प्रशासक मधल्या काळात बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होती त्यावेळी शरद पवार साहेबांचा फोन आला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अनस्कार यांना प्रशासक करा. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे तह्यात ते प्रशासक राहतील, असं मला वाटत आहे.






















