Sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊतांच पलटवार : ABP Majha
देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील झालेल्या भाजपच्या संमेलनातून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. यावरून आता संजय राऊतांनी पलटवार केलाय. आधी फडणवीसांची चौकशी करून त्याना अटक करण्याची मागणी राऊतांनी केलंय. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. पण, ज्या नेत्यांमुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे सगळे नेते आता भाजपसोबत आहेत, असा पलटवार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. एवढेच कशाला अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात ज्या व्यासपीठावरुन शरद पवार यांच्यावर आरोप केले तिकडेच अशोक चव्हाण हे शाहांच्या बाजूला बसलेले होते. अशोक चव्हाण यांच्यावरही अमित शाह यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ही गोष्ट अमित शाह यांच्या लक्षात नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते सोमवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
अमित शाह हे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याचा आरोप करतात. पण त्यांच्याच सरकारने शरद पवार यांना सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी त्याबद्दल शरद पवार यांचे कौतुकही केले होते. मी शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो, असेही मोदींनी म्हटले होते.