Raosaheb Patil Eknath Shinde Group : कट्टर शिवसैनिक रावसाहेब पाटलांचा शिंदे गटात प्रवेश
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह 100 समर्थकांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महादेवाच्या पिंडींवर हात ठेवून उध्दव ठाकरेंसोबत असल्याची निष्ठेची शपथ घेणारे जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात दाखल झालेत. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे. रावसाहेब पाटील यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाने शिंदे गटात प्रवेश केल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे
महत्त्वाच्या बातम्या














