Bhiwandi : दोन केंद्रीय राज्यमंत्री क्रिकेटच्या मैदानात, कपिल पाटील - रावसाहेब दानवे आमनेसामने
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त केंद्रीय राज्यमंत्री चषक भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन अंजुर येथे करण्यात आले असून 1 कार 30 बाईक अशा बक्षिसांची रेलचेल असलेल्या या स्पर्धे दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट दिली असता कार्यकर्त्यांच्या आग्रहा नंतर रावसाहेब दानवे यांनी हाती बॅट हाती घेतली असता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी चेंडू हाती घेत गोलंदाजी केली तर त्यावर रावसाहेब दानवे टोलेबाजी केली .तर या कार्यक्रमा निमित्त क्रिकेटपटूंना शुभेच्छा देताना संघटन कोणतेही असु द्या त्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते हे स्पष्ट केले.



















