Raj Thackeray : '... म्हणून तिसरी लाट जाणीवपूर्वक आणली जातेय', राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.मुंबईत काही ठिकाणी मनसेनं दहीहंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाऊन आवडे सरकारला म्हणत सर्व गोष्टी सुरु आहेत, मग सणांवरच का येता? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे.
दरम्यान, सरकारवर टीका करत राज ठाकरे म्हणाले, हजारो कोटींची कामं वाजवली आणि आता कोणी मोर्चे काढू नयेत म्हणून तिसऱ्या लाटेचा घाट घालण्यात येत आहे. असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारविरोधात हल्लाबोल केला.





















