NCP On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? अजित पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
NCP On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? अजित पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नाही, युतीची चर्चा ही कॅमेरासमोर होत नाही असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच या आधी 2014 आणि 2017 साली अशीच चर्चा झाली होती, त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावं लागत असल्याचं मनसेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं.


















