Modi Govt Implements CAA: बहुचर्चित ‘CAA’ ची अधिसूचना जारी, केंद्र सरकारकडून घोषणा
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारचा हा निर्णय गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. सीएए (CAA) कायद्यासंदर्भात केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार, ही बाब अटळ आहे. हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. परंतु, आता लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना काढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. यावर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या






















