वसईमध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे आणि शिवसैनिकांमध्ये राडा, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवांचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा आज वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भरसभेत राडेबाजी केली. “आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या” अशी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या समोरच राडा केला. याचवेळी पोलीस आणि शिवसैनिकांनी दोन मनसे कार्यकर्त्यांना चोप ही दिला. पोलिसांनी लागेच या दोघां कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवही वसईत आले होते. यावेळी त्यांनी वसई पोलीस ठाण्यातच परिवहन सेवेचा कार्यक्रम संपेपर्यंत थांबवण्यात आलं होतं. राडेबाजीचं नेमकं कारण काय आहे याबाबत पालघर आणि ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांनी.