Delhi CM Meet Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर : ABP Majha
गेल्या तीन महिन्यांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळेच सर्व विरोधक एकत्र आले आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय.. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्यांचे अधिकारी केंद्राने घेतल्यामुळे, अरविंद केजरीवाल संतापले आहेत. त्यांनी त्याविरोधात न्यायालयीन आणि आंदोलनाचा मार्ग निवडलाय. या लढ्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचं, केजरीवाल यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे, या मुद्द्यावर पाठीशी राहू असं आश्वासन ठाकरेंनी दिल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
