Chhagan Bhujbal On Oath Ceremony : शेवट चांगला तर सर्व चांगलं, मंत्रिपदाच्या घोषणेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal On Oath Ceremony : शेवट चांगला तर सर्व चांगलं, मंत्रिपदाच्या घोषणेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेेते छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ येणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा भुजबळांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर भुजबळांचा पत्ता कट झाला होता. त्यानंतर भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती.. आता भुजबळ मंत्रिमंडळात परतत आहेत.






















