Babanrao Taywade on OBC : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका : बबनराव तायवाडे : ABP Majha
राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 15 16% च्या वर नाही.. विदर्भात मराठा समाज नगण्य संख्येत आहे.. काही प्रमाणात कोकणात मराठा समाज असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या मध्येच मराठा समाजाची जास्त लोकसंख्या आहे.. तरी ती राज्य 27% असू शकत नाही असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.. या पूर्वी गायकवाड आयोगाने मराठा समाजाची लोकसंख्या 30% सांगितली होती.. आता राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाची लोकसंख्या 27% सांगितले असेल.. तरी ती 15 किंवा 16 % पेक्षा जास्त नाही... मराठा समाजातील अनेक जाती आधीच ओबीसी वर्गात समाविष्ट आहे.. त्या जातींना वगळूनच मराठा समाजाचा सर्वेक्षण करावे अशी आमची मागणी होती.. अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल की त्या जातींना वगळूनच सर्वेक्षण करण्यात आले आहे किंवा नाही असेही तायवाडे म्हणाले... पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एस इ बी सी श्रेणीमध्ये समाविष्ट करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं तसेच प्रयत्न या सरकारकडून केले जाईल असे भाकीतहि तायवाडे यांनी व्यक्त केले दरम्यान राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 15 ते 16 टक्क्यांच्या दरम्यान असताना त्यांना 10 ते 12 % आरक्षण देणे योग्य असल्याची प्रतिक्रिया ही तायवाडे यांनी दिली...