Nashik Long March : संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला, लालवादळ मुंबईत धडकणार
नाशिकमधून निघालेलं लाल वादळ एक एक पाऊल मुंबईकडे टाकतंय. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढलाय. याच लाँग मार्चमध्ये आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला आणि सरकारबद्दलचा आपला रोष व्यक्त केला. तर काही शेतकऱ्यांनी कांद्यासह टोमॅटो आणि कोथिंबीरही रस्त्यावर फेकून दिलीय.. लाँग मार्च मागे घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. सरकारनं फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा उपायांची आणि मदतीची पेरणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.. या बैठकीत तोडगा निघतो का?, हे पाहणं महत्त्वाचं असेल...




















