Parbhani Gram Panchayat Elections : एका जागेसाठी तब्बल २०३ उमेदवार, मराठा आरक्षणासाठी अनोखं आंदोलन
Parbhani Gram Panchayat Elections : एका जागेसाठी तब्बल २०३ उमेदवार, मराठा आरक्षणासाठी अनोखं आंदोलन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिलेली आहे जी आता संपत आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गावागावात आंदोलनाची तयारी केली जातेय.सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे या निवडणुकीत हि आरक्षणाची मागणी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव इथल्या एकाच जागेसाठी पोटनिवडणूक होतेय या निवडणुकीत गावकऱ्यांनी पहिल्यांदा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मात्र याने काही फरक पडणार नसल्याचे लक्षात येताच गावातील सर्वच महिलानी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अक्ख गावच वाजत गाजत पाथरी तहसील कार्यालयावर आले आणि एकुण २०३ महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले आहेत.आत जर सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक अन्यथा एकही महिला आपला अर्ज मागे घेणार नाही असा निर्धार या महिलांनी केलाय शिवाय पुढच्या लोकसभा,विधानसभेसह सर्व निवडणुकांत अशाच पद्धतीने सर्व गावकरी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा इशारा हि या गावकरी महिलांनी सरकारला दिलाय.या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी...