एक्स्प्लोर

Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत 9800 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन क्रॅश झाल्यानं ट्रम्प यांना मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं नुकसान झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ट्रम्प यांची नेटवर्थ 1.1 अब्ज डॉलर्सनं घसरण झाली आहे. याचं प्रमुख कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण होय. प्रामुख्यानं बिटकॉईन क्रॅश झाल्यानं ट्रम्प यांना फटका बसला आहे. 

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं नुकसान

फोर्ब्सच्या नव्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती  6.2 अब्ज डॉलर्स झाली आहे. जी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात संपत्ती 7.3 अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच ट्रम्प यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. रिपोर्टनुसार ट्रम्प यांची कंपनी टीएमटीजीच्या सेअरमध्ये घसरण झाली आहे. ही कंपनी डीजेटी टिकरनुसार व्यवसाय करते. 

गेल्या शुक्रवारी बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं टीएमटीजी स्टॉकमध्ये 10.18 डॉलर्सची घसरण झाली. ट्रम्प यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये काही दिवस घसरण होत आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुपचे सेअर गेल्या एक महिन्यात 35 टक्क्यांनी तर सहा महिन्यात 55 टक्क्यांनी घसरले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सप्टेंबर 2025 पर्यंत मोठी वाढ पाहायला मिळत होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. त्यामुळ डोनाल्ड ट्रम्प फोर्ब्सच्या अमेरिकेतील 400  श्रीमंत लोकांच्या यादीत पोहोचले होते. ट्रम्प यांनी 201 क्रमांक मिळाला होता. आता ट्रम्प यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. 

रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या संपत्तीतील वाढीचं कारण त्यांच्या कुटुंबानं क्रिप्टोमध्ये केलेली गुंतवणूक हे होतं. फोर्ब्सनुसार ट्रम्प आणि त्यांची तीन मुलं वर्ल्ड लिबर्टी  फायनान्शिअलचे सह संस्थापक म्हणून लिस्ट करण्यात आलं होतं. या विकेंद्रीत फायनान्शिअल प्लॅटफॉर्मला सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. कंपनीनं 100 अब्ज डॉलर्सचे WLFI टोकन बनवले होते त्यापैकी 22.5 अब्ज टोकन डीटी मार्क्स डीईएफआई एलएलसीला देण्यात आले होते. या कंपनीत ट्रम्प यांची जवळपास 70 टक्के भागिदारी होती. $ WLFI टोकन लाँच झालं तेव्हा त्याचं मूल्य 0.31 डॉलर्स होतं ते आता 0.158 डॉलर्सवर आलं आहे. 

नोव्हेंबर महिन्यातील सुरुवातीला सिक्यूरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे टीएमटीजीनं केलेल्या फायलिंग नुसार तिसऱ्या तिमाहीत त्यांचं नुकसान 54.8 मिलियन डॉलर्स इतकं होतं. कंपनीच्या बिटकॉईन होल्डिंग्जमध्ये 48 मिलियन डॉलर्सची घसरण झाली आहे. 

बिटकॉईनच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या आहेत.6 ऑक्टोबरला एका बिटकॉईनची किंमत 125000 अमेरिकन डॉलर इतकी होती. त्यात 30 टक्क्यांची घसरण होऊन ते 86174 डॉलरवर आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget