Parbhani : सरकारी तिजोरीवर डल्ला मारून शिंदेंनी कार्यकर्त्यांना पैसे वाटले: बाबाजानी दुर्राणी
परभणी जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती ती पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची मागच्या 30 वर्षापासून पाथरीवर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची सत्ता आहे मात्र ही सत्ता काबीज करण्यासाठी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेते सईद खान यांनी सर्व ताकद पणाला लावली होती मात्र असं असतानाही राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी 18 पैकी 12 जागा जिंकत पुन्हा एकदा या बाजार समितीवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या आहेत... या विजयानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका केलीये..
महत्त्वाच्या बातम्या























