(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai Flood : वसईच्या अंबाडी रोडवरील बिल्डिंगच्या तळमजल्यावरील घरात पाणी
वसई विरार मध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी या परिसरात रिमझिम पावसाची बरसात होत आहे. माञ काही ठिकाणी पाणी ओसरत नाही. अनेकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. वसईच्या अंबाडी रोड येथील सी कॉलनी लोटस बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश पेवेकर यांच्या घरात एबीपी माझा ची टिम पोहचली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ६३ वर्षाचे प्रकाश पेवेकर सारखे तळमजल्यावरील ३०० ते ४०० कुटुंबाच्या घरात पाणी साचलेलं आहे. घरातील सामानाचे अतोनात नुकसान झाले आहे. फ्रिज, वॉशिंग मशीन, खाद्य सामान, बेडचे सामान, यांनी घरातच वर ठेवलं आहे. पेवेकर स्वतः कुटुंबासमवेत सोसायटीतील एका रिकाम्या रुम मध्ये राहत आहेत. याच्यासारखेच काही सदस्यांनी तर हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेवून राहत आहेत. तर काहीजण टॅरेसवर राहत आहेत. तेथेच जेवण बनवून, झोपत आहेत. पाणी ओसरण्याची वाट आता हे कुटुंब बघत आहे. आणखीन दोन दिवस तरी घरातील पाणी ओसरणार नसल्याचं नागरीकांनी सांगितलं. घरात घाणीच साम्राज्य ही निर्माण झाल्याने घऱातील सामानचे नुकसान झाले आहेत. पाणी ओसरल्यावर आता आरोग्याचा ही प्रश्न निर्माण होणार आहे.