एक्स्प्लोर
Palghar : नदीच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांचा ट्यूबवरुन प्रवास, पालघरमधील धक्कादायक व्हिडीओ
पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. संततधार पावसानं पालघरच्या विक्रमगडच्या गारगाई आणि राखाडी नद्यांना पूर आलाय. या दोन्ही नद्यांच्या काठावर असलेल्या म्हसेपाडा गावातला काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ समोर आलाय म्हसेपाडातील काही विद्यार्थी टायर ट्यूबचा वापर करून नदीचं पात्र ओडांडत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. नद्यांना पूर आल्यानं गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा आहे. त्यात गावात जाण्यासाठी असलेला एकमेवर बंधाऱ्याचा रस्ता पाण्याखाली गेलाय त्यामुळे शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















