एक्स्प्लोर
Palghar Red Alert | Palghar मध्ये Red Alert, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, नद्यांना पूर
पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे सूर्या नदीमध्ये दहा हजार चारशे क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सातत्याने सुरू आहे. कालही मुसळधार पाऊस होता आणि आजही पावसाचा जोर कायम आहे. याच पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी क्षमता पूर्ण झाली आहे. "प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय."
आणखी पाहा























