Palghar Monsoon : बळीराजा पहिल्याच पावसात हैराण, मुसळधार पावसामुळे भातशेती पाण्याखाली
पालघर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने जोर पकडला असून चार तास उलटले तरीही मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे सर्व ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे तर गेल्या चार-पाच दिवस जो पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हळव्या भाताच्या भात पेरण्या केल्या होत्या मात्र आज हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने केलेल्या भात पेरण्या वाया जातात की काय असं चिन्ह निर्माण झाला आहे तर येत्या दोन दिवसांसाठी पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज ॲलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी























