(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Majha Impact: मोखाडाच्या कुर्लोद मधील नदीवरील पुलासाठी पाच कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर
Palghar Majha Impact: मोखाडाच्या कुर्लोद मधील नदीवरील पुलासाठी पाच कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर मोखाडाच्या कुर्लोद मधील नदीवर पूल नसल्याने नदीच्या प्रवाहातून गरोदर महिलेला दवाखान्यात नेण्याची पाळी आली. ही बातमी एबीपी माझा ने दाखवल्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेऊन तातडीने पालघरची जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन तातडीने ह्या ठिकाणी पर्यायी बोटीची व्यवस्था करायला लावली असून. या नदीवरील पुलासाठी पाच कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ह्या कामाचं टेंडर होऊन कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एबीपी माझाला फोनवरून दिले आहे.आजच पालघर चे उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे तातडीने कुरलोद कडे रवाना झाले असून आजच ह्या बोटीची व्यवस्था करणार असल्याची माहिती दिली आहे