Palghar Bike Accident : बोईसर-तारापूर रोडवर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर रोडवर शुक्रवारी भीषण अपघात झाला, यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जय अशोक भोये असं या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या २५ वर्षांचा होता. व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मारुती बलेनो कारनं कुठलाही सिग्नल न देता ब्रेक लावला, त्यामुळे शेजारच्या रिक्षाचालकानं आपला वेग कमी केला, आणि म्हणून दुचाकीस्वारानं देखील ब्रेक लावला, मात्र त्याचा तोल ढळला, आणि तो खाली पडला, मात्र दुर्दैवानं तेव्हाच समोरून येणाऱ्या टेम्पोचं चाक त्याच्या डोक्यावरून गेलं, ज्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. कुठलंही वाहन चालवताना समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवणं किती गरजेचं आहे, हेच यावरून पुन्हा अधोरेखित होतं.






















