Pakistan Spy Mohammad Tarif : सिमचा खेळ एअरबेसपर्यंत कसा गेला? पाकच्या गुप्तहेरानं सगळं सांगितलं
Pakistan Spy Mohammad Tarif : सिमचा खेळ एअरबेसपर्यंत कसा गेला? पाकच्या गुप्तहेरानं सगळं सांगितलं
‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत भारताने हवाई हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराने (Pakistan Army) पंजाबमधील अमृतसर (Amritsar) येथे असलेल्या सुवर्ण मंदिराला (Golden Temple) लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशनच्या तीन दिवसांत पाकिस्तान लष्कर भारतीय कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसवर निशाणा साधू शकला नाही, त्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिराकडे क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टमने या क्षेपणास्त्रांना आकाशातच निष्क्रिय केलं आणि हा हल्ला अपयशी ठरवला, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय लष्कराने केला आहे. पंजाबमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या एअर डिफेन्स युनिटने याबाबत खुलासा केला आहे.
मेजर कार्तिक सी यांनी सांगितले की, हल्ल्यात अपयश आल्यावर पाकिस्तान लष्कराने सामान्य नागरिकांना लक्ष्य करायला सुरुवात केली होती. 6-7 मेच्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असून, त्यानंतर दोन्ही बाजूंनी हल्ले थांबले आहेत. पण ऑपरेशन सिंदूर हे फक्त स्थगित करण्यात आले आहे, समाप्त नाही. त्याचा विनाशकारी टप्पा अजून बाकी आहे, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे.






















