Pakistan Loan:पाकिस्तानला मिळणार1.1अब्ज डॉलर्सचं कर्ज?कर्जाच्या पैशानं भारतावर हल्ले करण्याचे मनसुबे
Pakistan Loan:पाकिस्तानला मिळणार1.1अब्ज डॉलर्सचं कर्ज?कर्जाच्या पैशानं भारतावर हल्ले करण्याचे मनसुबे
भारत पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सर्व बाजूंनी हल्ले सुरु केले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. यानंतर पाकिस्तानने जागतिक बँकेकडे अपील केले आहे. मात्र, जागतिक बँकेनं पाकिस्तानला फटकारले आहे. यामध्ये आम्ही काहीही करु शकत नसल्याचे जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
भारताच्या वाट्याचे पाणी आता भारतासाठी वापरले जाईल
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची भूमिका फक्त मध्यस्थीची आहे. जागतिक बँक ही समस्या कशी सोडवेल याबद्दल बरीच अटकळ आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे कायदा आणि न्याय राज्यमंत्री अकील मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान किमान तीन वेगवेगळ्या कायदेशीर पर्यायांची योजना आखत आहे, ज्यामध्ये कराराची मध्यस्थ संस्था असलेल्या जागतिक बँकेसमोर हा मुद्दा उपस्थित करणे समाविष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी आधीच घोषणा केली आहे की भारताच्या वाट्याचे पाणी आता भारतासाठी वापरले जाईल. भारताच्या हक्काचं पाणी भारताच्या बाजूनेच वाहणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















