Nidhi Razdan Online Scam | NDTV च्या वृत्तनिवेदिका निधी राजदान यांची ऑनलाईन फसवणूक
एनडीटीव्हीची लोकप्रिय वृत्तनिवेदिका निधी राजदान एका ऑनलाईन स्कॅमला बळी पडल्याचं काही वेळापूर्वी त्यांनी स्वत जाहीर केलंय. जून 2020 मध्ये त्यांना जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून पत्रकारितेच्या प्रोफेसर म्हणून नेमणूक झाल्याचा मेल आला. त्या मेलनंतर त्यांनी तब्बल 21 वर्ष ज्या संस्थेत कार्यरत होत्या तिथली म्हणजेच एनडीटीव्हीची नोकरीही सोडली. मात्र जून महिन्यापासून वारंवार कोरोनाचं कारण देत त्यांची नियुक्ती लांबल्याचं सांगण्यात येत होतं, त्यामुळे निधी यांना संशय येऊ लागला. अखेर सहा महिन्यांनी त्यांनी पाठपुरावा करत छेट हार्वर्ड विद्यापीठातच फोन करुन विचारणा केल्यावर अशी कुठलीच नियुक्ती नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या





















