Manoj Jarange Maratha reservation : मराठा बांधवांचा 25 जानेवारी रात्रीचा मुक्काम नवी मुंबईत
Manoj Jarange Maratha reservation : मराठा बांधवांचा 25 जानेवारी रात्रीचा मुक्काम नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या बरोबर लाखो मराठा समाज येत आहे. २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत हा मोर्चा धडकणार आहे. लाखोच्या संख्येने येणाऱ्या मराठ्यांचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत होणार असल्याने त्यासाठी सोय करण्यात येणार आहे. शहरातील मैदाने , सामाजिक साभागृहे, शाळा, एपीएमसी मार्केट आदी ठिकाणी रहायची , जेवणाची , पार्किंग ची सोय करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका , सिडको , पोलीस आदी प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावे असे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे. दरम्यान नवी मुंबई महानगर पालिका याबाबत उधासिनता दाखवत असल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या























