Rupali Thombare Reaction On Rupali Chakankar Captain Ashok Kharat Case Pune Today News Update
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Ashok Kharat Case: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी या प्रकरणात खळबळजनक आरोप केलेत. आता या प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडतात हे आश्चर्यकारक आहे. जे काही त्यांच्यावर आरोप झाले, ज्या माध्यमातून त्यांना अटक केली. निंदनीय असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. महिला आयोगाच्या प्रमुख त्यांच्या ट्रस्टच्या विश्वस्त आहेत, असे माझ्या कानावर आले. त्यांनी जर नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी लगेच राजीनामा घ्यावा. राजीनामा देत नसेल तर त्यांना बडतर्फ करावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्णय घ्यावा, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती असल्याचे त्यांनी म्हटले.
Ashok Kharat Case: महिलांना संरक्षण दिले पाहिजे
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यामागे कोण आहे? कोण-कोण त्या महाराजांकडे जात होतं, या सगळ्याचा तपास केला पाहिजे. अशा महाराजांना महाराष्ट्रात ठेवू नये. त्यांच्या अंगातली मस्ती जिरवण्याची हीच वेळ आहे. हे प्रकार परत घडू नये, कोणी धाडस करू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, कारवाई करावी. महिलांना संरक्षण दिले पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षाच त्यांच्याशी संबंधित आहेत. त्यांना पदावरून काढले पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
Ashok Kharat Case: मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा
रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातचे पाद्यपूजन केल्याचा फोटो समोर आलाय. याबाबत विचारले असता संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, त्या मॅडमनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून अजून राजीनामा कसा दिला नाही? नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला पाहिजे होता. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातूनच नाही तर सगळ्या लोकांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे. महिला भगिनींवर झालेला अत्याचार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे. खरात प्रकरणात तत्काळ कठोर कारवाई व्हावी. हा महाराष्ट्राचा विषय आहे. एकट्या नाशिकचा नाही. महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्या ट्रस्टच्या सदस्य आहेत. मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, असे देखील त्यांनी म्हटले.
Ashok Kharat Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरात याला ताब्यात घेतले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, गेल्या काही वर्षांत ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते
























