Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फ तुंगार ट्रस्टमधील तिघांनी ठेवल्याचं समोर
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलीये... 30 जून 2022 रोजी पहाटे त्रंबकेश्वरच्या पिंडीवर बर्फ आढळल्याचं समोर आलं होतं.. दरम्यान त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती... त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली... त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचं समोर आलं... अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आलाय..























