Nashik Saptashrungi Ghat Accident : नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बसचा अपघात, एका महिलेचा मृत्यू
Nashik Saptashrungi Ghat Accident : नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बसचा अपघात, एका महिलेचा मृत्यू
Nashik Accident News : नाशिकच्या (Nashik News) सप्तशृंगी गड घाटात (Saptashrungi Gad Ghat) बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.
अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत एक महिला जखमी असल्याचे समजते आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
