Nashik MNS Hoardings : नाशिकमध्ये मनसेकडून होर्डिंगबाजी, मनसेचा भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर
मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर चांगलच राजकारण पेटलंय. टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा, अशी टीका भाजपने केली होती. त्यावर आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. "हा फक्त ट्रेलर होता.. वेळ आली तर पिक्चर पण दाखवू" असा मजकूर लिहीत नाशिकमध्ये होर्डींगबाजी करत टोल फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आलंय. अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांचं वाहन अर्धा तास रोखल्याच्या कारणावरून, संतप्त मनसैनिकांनी या टोलनाक्याची रात्री तोडफोड केली. त्यानंतर नाशिकमध्ये लागलेले हे बॅनर्स आता चर्चेचा विषय ठरु लागलेत.
महत्त्वाच्या बातम्या























