एक्स्प्लोर
Migrant Labour | नाशिकमधून परप्रांतिय मजुरांना घेऊन विशेष रेल्वे मध्य प्रदेशला रवाना
नाशिकरोड रेल्वेस्टेशनहून बुधवारी रात्री साडेनऊ वाजता 1,428 मजुरांना घेऊन मध्य प्रदेशच्या रेवाला 22 डब्यांची विशेष रेल्वे रवाना झाली. जिल्ह्यातील तहसील कार्यालयात नोंदणी केलेल्या मजूर आणि गरजूंना घेऊन रेल्वे मार्गस्थ झाली. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना फूड पैकेट्स, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या होत्या तसेच रेल्वेतिल प्रत्येक डब्याचे निर्जतुकीकरणही केले गेले होते. आपल्या गावी परतता येत असल्याने या मजूरांच्या चेहराऱ्यावर एक वेगळच समाधान बघायला मिळत होत. विशेष म्हणजे या रेल्वेसाठी मध्य प्रदेश सरकारने रेल्वे विभागाकडे 1 कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















