Malegaon Leopard : डोळ्यासमोर बिबट्या, चिमुकल्याचं प्रसंगावधान, 15 सेकंदाचा थरार ABP Majha
Malegaon Leopard : Malegaon News मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या (Leopard) मुक्त संचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील जय भवानी रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. आता मालेगाव (Malegaon) शहरात भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता. यावेळी मोहित विजय आहिरे (Mohit Vijay Ahire) या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीत जेरबंद केले. शहरातील भायगाव, जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये ही घटना घडली. बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी वनविभाग, पोलीस, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.























