एक्स्प्लोर
Hanuman Birth Place Raw : हनुमान जन्मस्थान वादा कायम, गोविंदनंद सरस्वती पत्रकार परिषद घेणार Nashik
नाशिकमध्ये साधुमहंतांमध्ये हनुमान जन्मस्थान वादावरून काल राडा झाल्यानंतर आज गोविंदनंद सरस्वती गुजरातकडे रवाना होणार आहेत. त्यांना नाशिक हद्दीच्या बाहेर जाईपर्यत पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. गोविंदनंद सकाळी नाशिकहून निघण्याआधी पत्रकार परिषद घेणार आहेत. दुसरीकडे गोविंदनंद यांचा दावा खोडून काढणारे नाशिककर हनुमान जन्मस्थळ बचाव समिती स्थापन करणार आहेत. अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थान आहे हे सिद्ध करण्यासाठी समितीच्या माध्यमातून लढा देण्यात येणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















