Narayan Rane | दिशा सॅलियनप्रकरणी नारायण राणेंचे बॉलीवूडसह मंत्र्यांवर गंभीर आरोप, राणेंचे आरोप कशाच्या आधारावर?
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला पन्नास दिवसांपेक्षा जास्तचा कालावधी उलटला आहे मात्र या 50 दिवसांमध्ये कुठल्याही ठोस निकषावर मुंबई पोलीस पोचली नसून हे प्रकरण अधिकच किचकट होत चाललं आहे. या प्रकरणात अनेक नामवंत राजकारणी आणि सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत मात्र त्यांना मुंबई पोलिस तपासासाठी का बोलवत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. सुशांतसिंग प्रकरणात सीबीआई चौकशी झाली पाहिजे, मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव असून हे सारं ठाकरे कुटुंबासाठी सुरू आहे. यामध्ये आदित्य ठाकरे कुठं तरी अडकला असल्याची टीका माजी खासदार, नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या














