एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar: मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं, रवींद्र धंगेकर- मुरलीधर मोहोळ वादात ट्विस्ट

Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : धंगेकर यांना पक्षातून काढून टाकलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर स्वत: रवींद्र धंगेकर यांनी पोस्ट करत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे चर्चेत आहेत. धंगेकर महायुतीत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते आहेत, मात्र त्यांनी महायुतीतील मित्रपक्षातील बड्या नेत्यांवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील  कोथरुड भागात घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. या घटनेवरून धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपचे नेते आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल करत निलेश घायवळ आणि त्यांच्या निकटवर्तीयाचे चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील घायवळ टोळीला आश्रय देत असल्याचं आणि मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर धंगेकरांनी पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन घोटाळ्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला. त्यांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी समज दिल्याच्या चर्चा पसरल्या होत्या.त्यानंतरही धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) आरोप सुरूच ठेवले, त्यानंतर आता पुन्हा एकदा धंगेकर यांना पक्षातून काढून टाकलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर स्वत: रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोस्ट करत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. 

Ravindra Dhangekar: धंगेकरांची मोहोळ यांचं नाव न घेता टीका

रवींद्र धंगेकर यांनी नाव न घेता पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते सोशल मिडीया एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, 2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता. तो कोण आहे, हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब...!!, अशी पोस्ट धंगेकर यांनी केली आहे. या पोस्ट त्यांनी #SaveHDN आणि #punelandscam असे दोन हॅशटॅग वापरले आहेत. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या पोस्टमध्ये टॅग केलेलं आहे.

एकीकडे रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता धंगेकर यांनी स्वत: पोस्ट करून संबंधित बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. याआधीही धंगेकर यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदे आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं पाठबळ नेहमी राहील, असं त्यांनी म्हटलं होतं. 

Ravindra Dhangekar: अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील

याआधीही धंगेकर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.आणि पुन्हा एकदा सांगतो..... भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..! 

Ravindra Dhangekar:  काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार.. 

 काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार.. मला एकनाथ शिंदेंचा कुठलाही फोन आलेला नाही आणि एकनाथ शिंदे मला कधीही पुणेकरांच्या हितासाठी लढण्यासाठी रोखणार नाही. कोण मुख्यमंत्रीचे स्वप्न बघत होते त्याच्यावर मी नक्कीच पुरावे सहित बोलेल.. मला रील स्टार म्हणणारे. मी कोणत्याही बिल्डरचं रील करत नाही तर सर्वसामान्य गोरगरिबांसाठी करतो, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Embed widget