Nanded : बीआरएस पक्ष विस्ताराची महाराष्ट्रातून सुरुवात, निमित्त सीमाभागातील मराठी लोकांच्या समस्येचं
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्ताराची सुरुवात आज महाराष्ट्रातून करण्यात आलीय... आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात सकाळपासून बैठकांचा धडका सुरू झालाय... विशेष म्हणजे सीमाभागातील मराठी लोकांच्या समस्येची उकल करण्याच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा घाट घातलाय... तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला देशव्यापी व्हायचंय... आणि त्याची सुरुवात त्यांनी पक्षाचं नाव TRS ऐवजी BRS म्हणजे भारत राष्ट्र समिती करून केलंय... आणि त्यांच्या नांदेडमधील धर्मापूरमधील बैठका त्याच विस्ताराचा भाग असल्याचं बोललं जातंय...























