Devendra Fadnavis : ठाकरे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार, खंडणी हाच यांचा एकमेव अजेंडा : देवेंद्र फडणवीस
नागपूर : राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण ती लपवून त्यामागे तत्वज्ञान उभं करणं हे चुकीचं आहे. भाबडेपणाचा मुखवटा आता उद्धव ठाकरेंनी दूर करावा अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस बोलत होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार."


















