एक्स्प्लोर
Sindhudurg Crime : कणकवलीमध्ये साळीस्तेमध्ये सापडलेला मृतदेह बंगळुरुतील रहिवाशाचा
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली (Kankavli) मधील साळिस्ते येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, मृत व्यक्ती बंगळूरु (Bengaluru) येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी (Srinivas Reddy) असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. 'तिलारी येथे दरीत रक्ताने माखलेली कार देखील रेड्डी यांच्याच मालकीची असल्याचे तपासात समोर आले आहे,' या माहितीमुळे हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत साळिस्ते येथे गुरुवारी अंगावर वारांचे व्रण असलेला आणि चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळला होता. त्याचवेळी, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथील मुख्य पुलाजवळ एक रक्ताने माखलेली, नंबर प्लेट नसलेली कार सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दोन्ही घटनांचा समांतर तपास सुरू केला असता, कार मालक आणि खून झालेली व्यक्ती एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळत असून मृताच्या नातेवाईकांच्या आगमनानंतरच या हत्येमागील खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
















