एक्स्प्लोर
Shivsena vs Shivsena : 'जंजीर में जकडा राजा मेरा अब्बी भी सत्ते भारी है', ठाण्यात Uddhav Thackeray गटाची Mahayuti विरोधात बॅनरबाजी
ठाण्यातील (Thane) तीनहात नाका परिसरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने महायुतीला (Mahayuti) डिवचणारे बॅनर लावले आहेत. ठाकरे सेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांनी लावलेल्या या बॅनरमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या बॅनरवर 'ये डर अच्छा लगा ईडी सीबीआय चुनाव आयोग फौज तो तेरी सारी है। पर जंजीर में जकडा राजा मेरा अब्बी भी सत्ते भारी है,' असा उल्लेख करत थेट आव्हान देण्यात आले आहे. 'जिथे फायदा तिथे आम्ही युती करू तिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही,' या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कथित वक्तव्याचाही यावर उल्लेख आहे. तसेच, 'महाविकास आघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचे काम चालू आहे,' या नरेश मस्के (Naresh Mhaske) यांच्या विधानाचाही समावेश करून महायुतीतील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवण्यात आले आहे. या बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















