Nagpur : संघ परिवारातील 36 संघटनांची आढावा बैठक नागपुरात ABP Majha
संघ परिवारातील विविध 36 संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक आजपासून नागपूर सुरू झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत विविध संघटनांचे संघटनात्मक सचिव हे उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष हे ही या बैठकीत उपस्थित राहणार आहे. संघाच्या विविध संघटनांमधील आपापसातील समन्वय, सोपवलेल्या कामाची पूर्तता आणि पुढील वर्षी करावयाच्या कामाचे नियोजन असं या बैठकीचा अजेंडा असणार असून वार्षिक पातळीवर होणारी ही बैठक यावर्षी नागपुरात होत असल्याने त्यास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोना काळात केलेले सेवाकार्य आणि सोबतच उत्तरप्रदेश सह विविध राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका हे पाहता ते मुद्देही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वतः या बैठकीत विविध संघटनांच्या कामांचा आढावा घेणार आ























