Fake Phone Call For Ministry : आमदारांना थेट मंत्रिपदाची ऑफरसाठी कॉल, भामट्याला पोलिसांनी कसं पकडलं?
Fake Phone Call For Ministry : आमदारांना थेट मंत्रिपदाची ऑफरसाठी कॉल, भामट्याला पोलिसांनी कसं पकडलं?
नीरज सिंह राठोड नावाच्या भामट्याने मध्य नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांना 5 मे पासून 16 मे दरम्यान पाच ते सहा वेळेला फोन केले होते. गुजरात मध्ये पक्षाचा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही निधी द्या अशी मागणी त्याने केली होती. मात्र आमदार विकास कुंभारे यांना ही व्यक्ती आपल्याला फसवत असल्याचे लक्षात आले. विकास कुंभारे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला तक्रार दिली.. त्यानंतर नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गुजरात मधून ताब्यात घेतले असून त्याला नागपूरला आणले जात आहे.























