Nagpur Orange Farming : बांगलादेशातील हिंसाचारामुळे नागपुरातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत
Nagpur Orange Farming : बांगलादेशातील हिंसाचारामुळे नागपुरातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत
दरवर्षी बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचा यंदा करायचं काय??? वैदर्भीय संत्रा उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी व निर्यातदार बांगलादेश मधील अराजक परिस्थितीमुळे सध्या या चिंतेत पडले आहे... बांगलादेश मध्ये गेले काही वर्ष सातत्याने विदर्भातून मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत होती.. गेल्या काही वर्षात बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर भरमसाठ आयात शुल्क लावले असले, तरी बांगलादेश मध्ये वैदर्भीय संत्र्याची मागणी कमी झाली नव्हती... त्यामुळे विदर्भातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्रा बागांमध्ये लाखो रुपये गुंतवून निर्यात योग्य, दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी खास प्रयत्न सुरू केले होते... मात्र आता बांगलादेश मधील अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे बांगलादेशातील एक ही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही.. तर स्थानिक व्यापारी ही बांगलादेशमध्ये संत्रा निर्यातीसाठी घेऊन जाण्यास तयार नाही.. त्यामुळे विदर्भात उत्पादित होणाऱ्या लाखो टन संत्र्याचा यंदा करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे... अजूनही संत्र्याचा उत्पादन बाजारात येण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे ( ऑक्टोबर महिन्यात संत्रा बाजारात येण्यास सुरुवात होईल)... यंदा संत्र्याचा बहार ही चांगला असल्याने दमदार उत्पादन होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकरी, व्यापारी व निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.. बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारा संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकते असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाटतंय.. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे... वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे दोघेही संत्रा उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील खासदार आहेत... त्यामुळे दोघांनी एकत्रित प्रयत्न करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येऊ घातलेल्या संकटातून बाहेर काढावं अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे...