Nagpur -Mumbai Samruddhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा घोटी ते भिवंडी डिसेंबरमध्ये सुरु
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा घोटी ते भिवंडी हा शेवटचा टप्पा डिसेंबर सुरू होणार आहे.. तशा सूचना राज्य सरकारकडून MSRDCला देण्यात आल्या आहेत. MSRDCच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंच एबीपी माझाला ही माहिती दिली.. एप्रिल २०२४मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत तरह ऑक्टोबर २०२४मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्याच्या आधी जनतेसाठी हा संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू आहे.. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सिन्नर ते कसारा टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल.






















