Nagpur Hit And Run Case | नागपूरमध्ये 24 तासात दोन हिट अॅण्ड रनच्या घटना! सायकलस्वराचा मृत्यू
नागपूरमध्ये २४ तासांच्या आत हिट अॅण्ड रनच्या तीन घटना... गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू.... तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं, भरधाव बसने वृद्ध सायकलस्वाराला उडवलं.
हे देखील वाचा
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत मोठी अडचण, कार्यभार महिला व बालकल्याण विभागाकडे ठेवण्याची मागणी
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana नागपूर: राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे. 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' (Chief Minister Ladki Bahin Yojana Maharashtra) योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सुक आहे. मात्र याचदरम्यान महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीत संदर्भात सुरुवातीलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेशी संबंधित तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद स्वीकारण्यास नकार दिले आहे. सरकारने तयार केलेल्या नियमाप्रमाणे तालुकास्तरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिव पद तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे. मात्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे.